Ad will apear here
Next
ढेपेवाड्यात रंगले ‘चिंटू आणि वाडा संस्कृतीतील खेळ’


पुणे : वाडा संस्कृतीतील पारंपारिक वातावरण, जुने खेळ, पाटावरील अस्सल मराठी भोजन अशा वातावरणात चिमुकल्यांना त्यांच्या आठवणीतील आजोळ, महिलांना मनातले माहेर सापडले. निमित्त होते ते पुण्याच्या जुन्या वाडा संस्कृतीचे प्रतीक असलेल्या ढेपेवाडातर्फे आयोजित  ‘चिंटू आणि वाडा संस्कृतीतील खेळ’ या उपक्रमाचे.

‘चिंटू’चे निर्माते चित्रकार चारुहास पंडित यांनी या सहलीतील सहभागी मुलामुलींना, पालकांना ‘चिंटू’ची रेखाटने करून दाखवली. मुलांनी ‘चिंटू’चे चित्र रंगविण्याचा आनंद लुटला. कार्टून, अॅनिमेशन या प्रकाराची माहितीही या वेळी पंडित यांनी दिली.

ढेपेवाड्याचे संचालक नितीन ढेपे आणि ऋचा ढेपे यांनी पुण्याच्या वाडा संस्कृतीतील पारंपरिक खेळ शिकवले. त्यात लगोरी, सागरगोटे, भोवरा, सूर पारंब्या, सारीपाट, खांब खांब खांबोळी, गोट्या, आंधळी कोशिंबीर, भातुकली, आट्यापाट्या अशा अनेक पारंपरिक खेळांचा समावेश होता.

या वेळी मुलांना वाडासंस्कृतीतील राहणीमानाची, जीवनशैलीची ओळख करून देण्यात आली. मुदपाकखाना, उखळ, जातं, तुळशी वृंदावन, विहीर, घंगाळ, चौरंग, झोपाळा या विस्मृतीत चाललेल्या गोष्टी बघून बालगोपाळ हरखून गेले. या उपक्रमात सात ते १४ वर्षे वयोगटातील मुलामुलींनी आपल्या पालकांसह एक वेगळा अनुभव घेतला.



बालगोपाळांनी ढेपेवाडा महाद्वार, दिंडी दरवाजा, देवळी, देवघर, दिवाणखाना, मुद पाकखाना, न्हाणीघर, शयनघर, पलंग अशा जुन्या वास्तू वैशिष्ट्यांसह पाहिला.

‘ढेपेवाडा हा मुळशीच्या गिरीवन पर्यटनप्रकल्पात असलेला पुणेरी वाडा असून, वाड्याची सर्व वास्तू वैशिष्ट्ये येथे पाहायला मिळतात. जुनी संस्कृती जपण्यासाठी खास ढेपेवाडा बांधून वाड्यातील संस्कृतीचे यथार्थ दर्शन व तशाच राहणीमानाचा, जीवनशैलीचा आनंद देणारे पुण्यातील हे एकमेव पर्यटन स्थळ आहे’ अशी माहिती नितीन ढेपे यांनी दिली.

या उपक्रमातून नव्या पिढीला एकत्रित कुटुंब पद्धतीची माहिती देऊन त्याचे महत्त्व सांगण्यात आले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZMWBU
Similar Posts
‘चिंटू आणि वाडा संस्कृतीतील खेळ’चे आयोजन पुणे : येथील जुन्या वाडा संस्कृतीचे प्रतीक असलेल्या ढेपेवाडातर्फे २४ नोव्हेंबर २०१८ रोजी ‘चिंटू आणि वाडा संस्कृतीतील खेळ’ या उपक्रमाचे आणि एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.
ढेपे वाड्यात ‘सूर मिलाफ’ला चांगला प्रतिसाद पुणे : मुळशीतील गिरीवन येथील ढेपे वाड्यात पाश्चिमात्य आणि भारतीय सुरांचा संगम असणाऱ्या ‘सूर मिलाफ’ या कार्यक्रमाचे आयोजन २७ जानेवारी २०१९ रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला.
ढेपे वाड्याला बौद्धिक स्वामित्व हक्क पुणे : येथील ढेपे वाडा ही वास्तू बौद्धिक स्वामित्व हक्क मिळवणारी देशातील पहिली पारंपरिक वास्तू ठरली आहे. ‘भारतीय पारंपरिक खेळ, खाद्यपदार्थ, पेहराव, तसेच विविध कला व संस्कृती जोपासण्याचे काम करणाऱ्या ढेपे वाडा या संकल्पनेला भारत सरकारकडून बौद्धिक स्वामित्व हक्क प्रदान करण्यात आला आहे,’ अशी माहिती ढेपे
पुण्यात राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन पुणे : सुपरमाइंड फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ युवा, नागपूर येथील नटराज निकेतन व सामवेद इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिकबंदी व प्लास्टिकऐवजी पर्यायी नैसर्गिक घटकांच्या वापरातून ‘गो ग्रीन- से नो टू प्लास्टिक’ संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language